होमपेज › Aurangabad › पत्रिका वाटण्यास जाणार्‍या नवरदेवासह तिघे ठार

पत्रिका वाटण्यास जाणार्‍या नवरदेवासह तिघे ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शिवना : प्रतिनिधी

स्वतःच्या लग्‍नसोहळ्याच्या पत्रिका वाटण्यासाठी नवरदेवासह त्याचे गावातील दोन मित्र तिबल सीट दुचाकीवर जात होते. या गाडीला अज्ञात वाहनाने पहिल्यांदा धडक दिली. त्यानंतर या दुचाकीने अन्य एका दुचाकीला उडविले. या तिहेरी अपघातात शिवना येथील तीन जण ठार, तर भोकरदन येथील दोन जण जखमी झाले. हा अपघात सिल्लोड शहराजीक भोकरदन रस्त्यावरील पिंप्री फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान घडला.

राहुल एकनाथ जगताप (20, नवरदेव),  जितेंद्र रतन जगताप (20) , राहुल सदाशिवराव जगताप (20, सर्व रा. शिवना, ता. सिल्लोड) अशी मृतांची नावे आहेत.  शुभम बाबूराव तळेकर व प्रज्वल फुसे (दोघे रा. भोकरदन) हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी घाटीत पाठविण्यात आले. या अपघातात जितेंद्र व  राहुल जगताप हे दोघे जागीच ठार, तर नवरदेव राहुल हा गंभीर जखमी झाला.

माहिती मिळताच गावकर्‍यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी लागलीच नवरदेव राहुल याला उपचारासाठी औरंगाबादला घेऊन जात असताना त्याचा आळंदनजीक मृत्यू झाला. तर दुसरीकडे शुभम व प्रज्वल हे दोघे जखमी झाले. त्यांना शिवसेनेचे महेश पुरोहित, भगवान बैनाडे, सरदार राजपूत, अजय थारेवाल, सिद्धार्थ जाधव यांनी घाटीत दाखल केले. हे दोघे सिल्लोडहून बहिणीच्या लग्नाच्या पत्रिका वाटून परतत होते, अशी माहिती मिळाली आहे. 

नवरदेव राहुल याचे काही दिवसांपूर्वी लग्‍न ठरले आहे. 1 एप्रिल रोजी त्याचे लग्‍न आहे. या लग्‍नाच्या पत्रिका पाहुणे मंडळींना वाटण्यासाठी तो आपल्या गावातील जितेंद्र आणि राहुल यांना सोबत घेऊन दुचाकी (क्र. एम.एच.20, ई एन.0466) वर भोकरदनहून सिल्लोडकडे तिबल सीट जात होता. ही गाडी गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरानजीक भोकरदन रस्त्यावरील पिंप्री फाट्याजवळ आल्यानंतर समोरून येणार्‍या अज्ञात वाहनाने तिला धडक दिली. त्यानंतर या दुचाकीने अन्य एका दुचाकीला उडविले.


  •