Sat, May 25, 2019 22:39होमपेज › Aurangabad › दंगेखोरांची धरपकड जोरात

दंगेखोरांची धरपकड जोरात

Published On: May 18 2018 1:15AM | Last Updated: May 18 2018 12:22AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

दंगलीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्‍तांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले. 50 अधिकारी, कर्मचार्‍यांच्या या पथकाने सोमवार ते गुरुवार या चार दिवसांत 46 दंगेखोरांना अटक केली. यात नगरसेवक राजेंद्र जंजाळ, फेरोज खान, लच्छू पहेलवान या राजकीय पदाधिकार्‍यांचाही समावेश आहे. सीसीटीव्ही, मोबाइल फुटेजवरून पोलिसांनी जवळपास 100 ते 150 आरोपी निष्पन्न केले, मात्र त्यातील अनेक जण मिळून येत नाहीत. ते घराला कुलूप लावून भूमिगत झाल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या अडचणीत भर पडली आहे.  

शुक्रवारी रात्री गांधीनगर, मोतीकारंजा, नवाबपुरा, राजाबाजार, जिन्सी भागात झालेल्या दंगलीनंतर पोलिसांनी दंगेखोरांवर विविध 14 गुन्हे दाखल केले आहेत. प्रत्येक गुन्ह्यासाठी वेगळा तपास अधिकारी देण्यात आला असून या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिस आयुक्‍त मिलिंद भारंबे यांनी सोमवारी विशेष तपास पथकाचीही नियुक्‍ती केली. उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्‍त चंपालाल शेवगण यांच्यासह पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलिस कर्मचार्‍यांचा या पथकात समावेश आहे. त्यांनी जोमाने काम सुरू केले असून अटकसत्र पहिल्या दिवसापासून वेग घेत आहे. फुटेज गोळा करणे, ते तपासणे, आरोपी निष्पन्न करणे, त्याची माहिती धरपकड करणार्‍या पथकाला देणे असे या विशेष पथकाचे काम सुरू आहे. 

बन्सिले खून; संशयित ताब्यात 

शहागंज गांधीभवनाजवळ घर पेटवून दिल्यामुळे दंगलीत जगनलाल बन्सिले या ज्येष्ठ अपंग नागरिकाचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणी अनोळखी जमावाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा तपास देखील वेगात सुरू आहे. या परिसरातील काही संशयितांना चौकशीसाठी गुरुवारी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची विशेष तपास पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे.
तपास पुढे सरकला

एसआयटीने जवळपास 150 ते 200 व्हिडिओ तपासले. त्यातून अंदाजे 100 ते 150 संशयित निष्पन्न झाले. यापैकी बुधवारपर्यंत 35 आरोपींना अटक केली होती. गुरुवारी हा आकडा 46 झाला. आता पोलिसांनी फुटेजसोबतच अटकेतील आरोपींकडून साथीदारांची नावे घेण्यास सुरुवात केली आहे. सोबत