Tue, May 21, 2019 18:10होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : पालिका आयुक्तांवरही कारवाई

औरंगाबाद : पालिका आयुक्तांवरही कारवाई

Published On: Mar 16 2018 7:02PM | Last Updated: Mar 16 2018 7:18PMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना काल सक्तीच्या रजेवर पाठविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली होती. त्यानंतर आज सकाळी डी.एम. मुगळीकर यांची महानगरपालिका आयुक्त पदावरून बदली करण्यात आली. आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारचे उप सचिव निपुण विनायक यांची महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

कचरा टाकण्यास विरोध करणार्‍या मिटमिट्यातील नागरिकांना झोडपून काढणार्‍या पोलिसी कारवाईचा फटका पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना बसला आहे. यानंतर आज सकाळी वेगवान हालचाली होत मिटमिट्यात कचरा नेण्याचे आदेश देणारे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांचीही बदली करण्यात आली. आज सकाळी औरंगाबाद येथील वैधानिक विकास महामंडळात त्यांच्या बदलीचे आदेश आले. यावेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे पालिकेचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकारचे उपसचिव निपुण विनायक यांची महापालिका आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

 

Tags : aurangabad, aurangabad news, aurangabad municipal corporation, mitmite region, garbage dumping, police lathi charge, commissioner, d.m muglikar, transfer, yashasvi yadav, compulsory  leave