Sun, Mar 29, 2020 08:37होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत 'सारी'मुळे एकाचा मृत्यू

औरंगाबादेत 'सारी'मुळे एकाचा मृत्यू

Last Updated: Mar 24 2020 7:23PM

संग्रहीत छायाचित्रऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा  

कोरोना सोबतच आता सारी (सिव्हिअरली ॲक्युट रेस्पायरेटरी इलनेस) या नवीन आजाराने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. कोरोना सारखीच लक्षणे असलेल्या सारीच्या आजाराने मंगळवारी शहरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. 

वाचा :औरंगाबाद : वादातून पती पत्नीची विहिरीत उडी; पती वाचला तर पत्‍नीचा मृत्‍यू

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका स्तरावर आठवडाभरापासून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाने केलेल्या सुचनेनूसार महापालिका आयुक्त आस्तिककुमार पांडेय प्रत्येक ठिकाणी स्वतः लक्ष ठेऊन आहेत. शहरात येणारे विदेशी नागरिकांसह, इतर शहरातून आलेल्या प्रवाशांची महापालिकास्तरावर तपासणी केली जात आहे. एकीकडे कोरोना रोखण्यासाठी तयारी सुरू असताना दुसरीकडे सारी या आजाराने एकाचा मृत्यू झाला आहे. या आजाराची लक्षणे सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनासारखीच असून दोन दिवसातच रुग्णांची तब्येत चिंताजनक होते. त्यातच त्याचे निधन होते. मंगळवारी एका तरुणाचा सारीने बळी घेतला. त्यामुळे शहरातून कोरोना व्हायरस हद्दपार झाला असे म्हणता येणार नाही, असे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले. 

वाचा :कोरोना : कारागृहातील कैद्यांची संख्या होणार कमी

खासगी रुग्णालयाकडून मागविली माहिती 

सारी संदर्भात माहिती मिळताच अशी लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती खासगी रुग्णालयांकडून मागविण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिका सतर्क आहेच, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी पाडळकर यांनी सांगितले.

वाचा :औरंगाबाद : हॉटेल मालकास दहा हजार रुपयांचा दंड