Tue, Mar 26, 2019 11:42होमपेज › Aurangabad › बजेटच्या प्रति भिरकावल्या ४ नगरसेवकांचे निलंबन

बजेटच्या प्रति भिरकावल्या ४ नगरसेवकांचे निलंबन

Published On: Apr 29 2018 2:13PM | Last Updated: Apr 29 2018 2:13PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महापालिका वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास सभापतींना विरोध करीत घोषणाबाजी करून अडथळा आणणाऱ्या चार  नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द करण्यात आले.

तीन दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या निवृत्त सदस्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.  यावेळी शहर विकास आघाडीचे गटनेते तथा मावळते सभापती गजानन बारवाल यांनी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही पुन्हा  स्वतःच्याच नावाची शिफारस केली.  

यामुळे शहर विकास आघाडीतील सदस्यांनी रविवारी (दि 29) सभागृहात विशेष बैठकीमध्ये त्यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्याला विरोध केला. मावळत्या सभापतींनी विकास आघाडीतील सदस्यांचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा अंदाजपत्रक सादर करण्यास परवानगी देऊ नये अशी त्यांनी मागणी केली होती. परंतु, महापौरांनी सभापती श्री बारबालांना यांना वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्यास पाचारण केले. यावेळी आघाडीचे नगरसेवक कैलास गायकवाड,  गोकुळ मलके, राहुल सोनवणे व रमेश जायभाय यांनी याला जोरदार विरोध करत घोषणाबाजी सुरू केली. महापौर पक्षपात करत असल्याचा आरोप करून बजेटच्या प्रति सभापती व महापौरांच्या अंगावर फेकल्या. सभागृहात गोंधळ केल्याने महापौरांनी चारी सदस्यांचे निलंबन केले.