Wed, Apr 24, 2019 21:39होमपेज › Aurangabad › 'एमआयएम' चे धरणे आंदोलन, सिटी चौक ठाण्यासमोर घोषणाबाजी

'एमआयएम' चे धरणे आंदोलन, सिटी चौक ठाण्यासमोर घोषणाबाजी

Published On: Jun 26 2018 4:41PM | Last Updated: Jun 26 2018 4:41PMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

11 आणि 12 मे रोजी राजाबाजार, शहागंज भागात झालेल्या दंगलीतील आरोपींना सोडा, नवीन गुन्ह्यात अटक करू नका, या मागण्यांसाठी सिटी चौक ठाण्यासमोर दोन हजारांचा जमाव एकत्र जमला आहे. एवढ्‍या मोठ्‍या संख्येने जमाव जमल्‍याने परिसरातील दुकाने बंद करण्यात आली आहेत. सिटी चौक ते शहागंज आणि भडकल गेट रस्ता बंद करण्यात आला आसून या ठिकानी पोलिसांविरूध्द घोषणाबाजी करण्यात येत आहे. 

११ आणि १२ मे रोजी झालेल्‍या दंगलीत बन्सीले यांचा मृत्यू झाला होता, त्या गुन्ह्यात अटक झालेल्या 17 आरोपींपैकी 6 आरोपी पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते, त्यांना कोर्टाच्या आदेशाने पोलिसांनी हस्तांतरित केले असून, त्यांना अटक करू नये अशी एमआयएम ची मागणी आहे. या मागणीसाठी मोठ्‍या संख्येने जमाव सिटी चौक पोलिस ठाण्यासमोर जमला आहे. त्‍यामुळे या ठिकानी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. परिस्‍थितीचे गांभीर्य ओळखून  या परिसरात  शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत.