Sat, Nov 17, 2018 08:02होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : 'वाळूज औद्योगिक तोडफोड प्रकरणाशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही'

औरंगाबाद : 'वाळूज औद्योगिक तोडफोड प्रकरणाशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही'

Published On: Aug 14 2018 2:43PM | Last Updated: Aug 14 2018 2:42PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

वाळूज औद्योगिक वसाहतीत गुरुवारी झालेल्या तोडफोडीत उद्योगांचे तब्बल 50 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. या तोडफोड प्रकरणी येथील एमआयडीसी वाळूज तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा काहीही संबंध नाही असे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलीस आयुक्तांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. आतापर्यंत ५३ जणांना अटक करण्यात आली असून आम्ही जातनिहाय अटक करीत नाहीत पण अटकेतील लोकांचा आंदोलनाशी संबंध नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याची सांगण्यात येत होते.