Wed, Feb 20, 2019 16:58होमपेज › Aurangabad › ‘ते तिघे ऊसाच्या फडात आईची वाट बघतायत’

‘ते तिघे ऊसाच्या फडात आईची वाट बघतायत’

Published On: Dec 13 2017 1:53AM | Last Updated: Dec 13 2017 11:56AM

बुकमार्क करा

कन्नड हतनूर : प्रतिनिधी

तालूक्यातील आलापूर शिवारात ऊस तोडणी चालू असताना उसतोड मजुरांना ३ बिबट्याची पिले आढळून आली. ही माहिती शेत मालकांनी वन विभागाला दिली. यामुळे तात्काळ वन विभागाचे परीक्षेत्र अधिकारी अनिल राहणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. आलापूर शिवारातील गुलाबराव विश्वनाथ कोरडे यांच्या गट क्रं. ४७ मधील उसाची तोडणी चालू आहे, मंगळवारी तीन वाजता उसतोड मजूरांना शेतात बिबट्याची तीन पिले आढळून आली. यावेळी त्यांनी ही माहिती गुलाबराव कोरडे, माजी सरपंच त्र्यंबक कोरडे यांना दिली. यावेळी वन विभागाचे परीक्षेत्र अधिकारी अनिल राहणे, लहानू घुगे, आर. व्ही. शिंदे, एम. आर. घोरसाळे, एन.के. घोडके व वन मजूर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

सदरील पिले बिबट्याची असल्याची खात्री झाल्यानंतर पिले सापडली त्याच ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. वन विभागाचे कर्मचारी या पिलांवर लक्ष ठेवून आहेत. आलापूर शिवारात बिबट्याची पिल्ले सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या भागात अनेक दिवसापासून बिबट्या दिसल्याचे अनेक शेतकऱ्यानी सांगितले होते. या परिसरात बिबट्याच्या मादिने पिल्लाने जन्म दिल्याने या परिसरात बिबट्याचा वावर होता हे सिध्द झाले आहे. वनविभागाने आता पिल्लाच्या आईच्या शोध मोहिम चालवली असून रात्रभर दहाच्या जवळपास कर्मचारी वनविभाग परीक्षेत्र अधिकारी अनिल राहणे यांच्यासह पहारा देत आहे. 

आलापूर शिवारात उसाच्या शेतात तीन बिबट्याची पिल्ले सापडली असून  ते  १५ ते २० दिवसाची असून त्याना त्याच जागेवर ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी आनिल राहणे यांनी केले आहे.