Wed, Jun 26, 2019 18:14होमपेज › Aurangabad › विजेच्या धक्‍क्‍याने दोन गायींचा मुत्यू.

विजेच्या धक्‍क्‍याने दोन गायींचा मुत्यू.

Published On: Jun 21 2018 4:32PM | Last Updated: Jun 21 2018 4:32PMकरमाड  :  प्रतिनिधी 

औरंगाबाद तालुक्यातील दुधड येथील शेतकरी भाऊसाहेब पुंजबा चौधरी यांच्या दोन गायींवर वीज पडल्‍याने दोन गायी जागीच दगावल्‍याची घटना घडली. 

याविषयी अधिक माहिती अशी, गट नं.५३  येथे शेतकरी भाऊसाहेब पुंजबा यांनी उन्हाची तीव्रता अधिक असल्‍याने गोठयातील दोन गायींना लिंबाच्या झाडाखाली बांधल्‍या.  त्‍यात अचानक दुपारी ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि तीन वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसास सुरुवात झाली. या दरम्‍यान गोठ्यासमोर ज्‍या लिंबाच्या झाडाला गायी बांधल्‍या होत्‍या त्‍याच झाडावर गर्जना करत वीज पडली. त्यामध्ये दोन गायींना विजेचा धक्‍का बसल्‍याने त्‍या दंगवल्याची घटना घडली. सदर घटनास्थळी मंडळ अधिकारी यांनी भेट दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.