Tue, Nov 20, 2018 23:38होमपेज › Aurangabad › औरंगाबादमध्ये हॉटेलमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, कुकवर चाकूहल्ला

औरंगाबादमध्ये हॉटेलमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

जालना रोडवरील हॉटेल स्पायसी कृंचमध्ये धिंगाणा घालीत चोरट्यांनी कुकवर चाकूहल्ला केला. यामध्ये कुक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळाल्यावर चिकलठाणा पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेतली. अधीक्षक डॉ.आरती सिंह, अप्पर अधीक्षक उज्ज्वला वनकर यांनी जखमीची विचारपूस करून घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या आहेत.