Thu, Apr 25, 2019 23:29होमपेज › Aurangabad › औरंगाबाद: कचरा प्रश्नाचा दुसरा बळी

औरंगाबाद: कचरा प्रश्नाचा दुसरा बळी

Published On: Mar 16 2018 2:06PM | Last Updated: Mar 16 2018 2:06PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील कचराकोंडीचा प्रश्न हाताळण्यात अपयशी ठरल्यामुळे अखेर दीपक मुगळीकर यांची मनपा आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुगळीकर हे कचराकोंडीचे दुसरे बळी ठरले आहेत. कचराप्रश्नी आंदोलकांवर दडपशाही केल्याप्रकरणी शहराचे पोलिस पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना कालच सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते. 

नारेगाव येथील कचरा डेपो बंद झाल्याने महिनाभरापासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. मनपाला कचरा साठविण्यासाठी अजूनही पर्यायी जागा मिळालेली नाही. परिणामी शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग साचले आहेत. मुगळीकर यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले असून त्यांची मराठवाडा विकास मंडळावर बदली करण्यात आली आहे.