Mon, Jul 13, 2020 00:47होमपेज › Aurangabad › औरंगाबादेत कोरोनाबधितांचा आकडा १६०० पार

औरंगाबादेत कोरोनाबधितांचा आकडा १६०० पार

Last Updated: Jun 02 2020 9:01AM
औंरगाबाद : पुढारी वृत्तसेवा

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या बारा तासात ५५ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६४२ झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला, कोरोनाबाधित १६४२ पैकी १०४९ कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत ७९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ५१४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. शहा बाजार (१), किराडपुरा (२), चंपा चौक (१), कटकट गेट (१), नारळीबाग (१), गणेश कॉलनी (१), जवाहर नगर (१), भीम नगर (२), हमालवाडी (१),  शिवशंकर कॉलनी (२), नाथ नगर (२), ज्योती नगर (१), फजलपुरा परिसर (१),  मिल कॉर्नर (१), एन-3 सिडको (१), एमजीएम परिसर (१), रोशन गेट (१) , विशाल नगर, गारखेडा परिसर (१), एन-सहा संभाजी कॉलनी (१), समता नगर (५), अंहिसा नगर (१), मुकुंदवाडी (१), विद्या निकेतन कॉलनी (१), न्याय नगर (१),  बायजीपुरा (२), संजय नगर, मुकुंदवाडी (४), विजय नगर (२), यशवंत नगर, पैठण (१), चंपा चौक, म्हाडा कॉलनी (१), नेहरु नगर (१), जुना मोंढा नाका परिसर (१), अन्य (३) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २४ महिला आणि ३१ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये खिवंसरा पार्क, गारखेडा परिसरातील कोरोनबाधित  ६४ वर्षीय पुरूष रुग्णाचा १ जून रोजी रात्री  ११.३० वा. उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ६३,  खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १५, मिनी घाटीमध्ये ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ७९ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.