Sun, May 26, 2019 21:21होमपेज › Aurangabad › शाँर्ट सर्किटने लागलेल्‍या आगीत लाखोंचे नुकसान

शाँर्ट सर्किटने लागलेल्‍या आगीत लाखोंचे नुकसान

Published On: Jul 29 2018 5:29PM | Last Updated: Jul 29 2018 5:29PMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

विहामांडवा येथिल आसाम टी कंपणीचे एजंसी धारक व वैष्णवी टी सप्लायर्सचे मालक कैलास नवपुते व त्यांचे धाकटे बंधु विश्वंबर नवपुते यांच्या सागवानी मकानाला शाँर्ट सर्किटने आग लागली. या आगीत मकानासह सर्व संसार उपयोगी साहित्य व विक्रम चहाचा साठा आगीत जळून खाक झाला. सदरिल घटनेची माहिती मिळताच विहामांडवाचे तलाठी सरोदे व चौकीचे स.पो.उप निरिक्षक प्रदिप एकशिंगे यांनी पाहणी करुन पंचनामा केला आहे.ही घटना 28 जुलैला शनिवारी रात्री 01 ते 01:30 वाजण्याच्या दरम्यान घडली. 

कैलास फकिरचंद नवपुते यांच्याकडे आसाम टी कंपणीची वैष्णवी टी सप्लायर्स नावाची विक्रम चहाची एजंसी आहे. नेहमी प्रमाने नुकताच त्यांनी टी कंपणी कडुन माल भरला होता व त्यांचे लहान भाउ विश्वंबर नवपुते यांचे येथिल मुख्य बाजारपेठेत किराणा दुकाण आहे. त्यांचे इतरत्र गोडावुन नसल्याने संपुर्ण माल ते राहत्या घरीच साठा करुन ठेवला होता. ते राहत असलेल्या सागवानी घराच्या बाहेरिल लाकडी खांबावर विद्दुत मिटर बसविलेले होते. मध्यरात्री सर्व जण झोपेत असतांना अचानक जळत असलेल्या वायरिंगचा विश्वंबर नवपुते यांना वास आल्याने त्‍यांना जाग आली त्यांनी उठुन पाहिले असता, संपुर्ण घरात आग लागल्याचे लक्षात आले. यावेळी त्‍यांनी आरडाओरड करत सर्वांना जागे केले तोपर्यंत आग सर्व घरात पसरली होती. आरडाओरड ऐकुन गल्लीतिल रहिवाशी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष कचरु दादा नवपुते ग्रा.प. सदस्य अनिल आबा तुपकरी, सरपंच संतोष नवपुते , माजी सरपंच सुधाकर आप्पा तुपकरी,ओम तुपकरी सह ग्रामस्थांनी धाव घेत सात-आठ बोअरवेल्सवरिल मोटारी तात्काळ चालु करुन आग आटोक्यात आणली. तोपर्यंत कैलास नवपुते व विश्वंबर नवपुते यांचे चौदा खण सागवानी मकानासह घरातिल फ्रिज, धान्य, टि व्ही संच, संगणक संच, कपडे, विक्रम चहाचा पंधरा लाखाच्या साठ्यासह सर्व संसार उपयोगी साहित्य जळुन खाक झाले. यात सुमारे 47 लाख 60 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज केलेल्या पंचनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. घरासह संपुर्ण मालाचा साठा जळुन खाक झाल्याने नवपुते कुटूंब एका रात्रीत रस्त्यावर आल्याने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.