Thu, Jun 27, 2019 18:39होमपेज › Aurangabad › खासदार खैरेंना चिमटे अन् मुका मार...

खासदार खैरेंना चिमटे अन् मुका मार...

Published On: Feb 24 2018 12:41PM | Last Updated: Feb 24 2018 2:52PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

नारेगाव कचरा डेपोवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी खासदार चंद्रकांत खैरे पालकमंत्र्यांसोबत आले होते.यावेळी आंदोलनकर्त्यांचे  नेते कुंडलिक पाटील अंभोरे यांनी पालकमंत्र्यांसमोर आंदोलनकर्त्यांची  भूमिका मांडताना जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खैरे यांना चांगलेच चिमटे घेतले. त्यांच्या वक्तव्याने खैरेंना चांगलाच मुका मार बसल्याची चर्चा यावेळी परिसरात होती.

अंभोरे म्हणाले, खैरे साहेब मांडकीला  खूप मानायचे. मांडकी म्हणजे प्यारे गाव होते त्यांच्यासाठी. पूर्वी हा त्यांचा मतदारसंघ होता. आताही त्यांचे  प्रेम आहे, पण मतदारसंघ नसल्याने ते इकडे पाहात नाहीत. तुमच्या दोन्ही आमदारांनीही ही  घाण आमच्याकडे नको, अशी भूमिका घेतली, अशा शब्दांत संतप्त भावना व्यक्त केल्या.  तसेच पालकमंत्र्यांना उद्देशून अंभोरे म्हणाले, पालकमंत्री साहेब, तुम्ही यात पडू नका. गेल्या 30-40 वर्षांपासून आम्ही या मरणयातना सहन करतोय, आता परिस्थिती नाजूक बनली आहे. 

पण कचरा येऊ देणार नाही

लाठ्या खाऊ, हर्सूल काय, येरवड्यातही जाण्याची आमची तयारी आहे. आम्ही कचऱ्याची एकही गाडी येऊ देणार नाही, असे म्हणत कचरा उचलण्यासाठी ठेकेदाराला 750 रुपये प्रतिटन एवढा महागडा दर  देणार्या मनपाने इथल्या कचर्यावर, आसपासच्या गावावर किती खर्च  केला, तुम्ही विचारा त्यांना... अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्र्यांना केली. कचर्याच्या गाड्या अडवल्यानंतर शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा निर्माण  झालेला प्रश्न तुम्हाला दिसला. त्यांच्यासाठी मास्क खरेदी केले. दवाखाने चोवीस तास सुरू ठेवले, आमच्यासाठी काय केले? असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी  उपस्थित केला. आमचे आंदोलन आजचे नाही. 40 वर्षांपासून आम्ही झटतोय. चार महिन्यांपूवीही असेच आंदोलन केले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या सांगण्यावरून मुदत दिली. मात्र  मनपाकडे ठोस कार्यवाही नाही.