होमपेज › Aurangabad › औरंगाबाद सेक्स रॅकेट : फ्लॅट ते स्पा...हेच जग

औरंगाबाद सेक्स रॅकेट : फ्लॅट ते स्पा...हेच जग

Published On: Dec 13 2017 2:40AM | Last Updated: Dec 13 2017 8:41AM

बुकमार्क करा

औरंगाबाद :  प्रतिनिधी

प्रोझोन मॉलमधील ‘अनंतरा’ आणि ‘डी स्ट्रेस हब’ या दोन्ही ‘स्पा’मध्ये देहविक्रीसाठी आणण्यात येणार्‍या विदेशी तरुणींवर व्यवस्थापनाने प्रचंड निर्बंध लादलेले होते. राहण्यासाठी दिलेला ‘फ्लॅट ते स्पा’ इतकेच त्यांचे जग होते, या पलीकडे त्यांना कोठेही जाण्याची मुभा नव्हती, असे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. 

या ठिकाणाहून पकडण्यात आलेल्या देहविक्री करणार्‍या नऊही तरुणी या थायलंडच्या नागरिक आहेत. एक तर त्यांना पर्यटन व्हिसावर भारतात आणण्यात येत होते. नियमानुसार या व्हिसावर आलेल्या पर्यटकांना ते जेथे जातील त्या शहरात पोलिसांकडे जाऊन आपल्या वास्तव्याची नोंद करणे बंधनकारक असते. शिवाय त्यांना कोणताही व्यवसाय करता येत नाही. ‘स्पा’ व्यवस्थापन या तरुणींना देहविक्रीच्या व्यवसायासाठीच भारतात आणत होते. मात्र, ज्या शहरात त्यांना नेण्यात येत, तेथे त्यांची नोंद करण्यात येत नसे. कारण त्यामुळे त्या पकडल्या जाऊ शकतात, अशी भीती होती. त्यामुळे अनधिकृतरीत्या ज्या शहरात देहविक्रीसाठी त्यांना नेण्यात येत होते, तेथे त्यांच्यावर ‘स्पा’ व्यवस्थापन प्रचंड निर्बंध लादत असे, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

औरंगाबादेत या तरुणींना प्रझोन मॉलसमोरच असलेल्या एका पाच बीएचके अलिशान फ्लॅटमध्ये ठेवण्यात येत असे. दिवसभर ‘स्पा’मध्ये त्यांच्याकडून देहविक्री करून घ्यायची आणि रात्री फ्लॅटवर आणून सोडायचे..फ्लॅटवर आल्यानंतर किंवा ड्युटीवर असताना तेथून बाहेर पडण्याची त्यांना मुभा नव्हती. बाहेर पोलिसांच्या किंवा कुणाच्या लक्षात येऊ नये, त्या पकडल्या जाऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात येत असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. 

 

वाचा : 

‘स्पा’मध्ये गर्लफ्रेंड असल्याचा बनाव

दर दोन महिन्यांनी बदलल्या जायच्या तरुणी!

‘स्पा’चे जगभर ‘जाळे’

सलूनचा एका दिवसाचा गल्ला दहा लाख रुपये!

आंतरराष्ट्रीय देहव्यापाराचा पर्दाफाश