Thu, Oct 17, 2019 04:18होमपेज › Aurangabad › एटीएम बदलून शेतकऱ्याची ६३ हजाराची फसवणूक 

एटीएम बदलून शेतकऱ्याची ६३ हजाराची फसवणूक 

Published On: Mar 01 2018 9:15PM | Last Updated: Mar 01 2018 9:15PMकन्नड :प्रतिनिधी

शहरातील एसबीआय बँकजवळ आसलेल्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास एका अनोळखी व्यक्तीने ६३ हजार रूपयाला फसविले आहे. याबाबत शहर पोलिसात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. दि. २६ फेब्रुवारी रोजी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेल्या एसबीआय बँकच्या एटीएममध्ये किशोर भिवलाल चव्हाण रा वडनेर येथील शेतकरी गेले असता येथील एका अनोळखी इसमाने एटीएम कार्डची हातचालखी करून ४० हजार रूपये दुसऱ्या खात्यावर ट्रॉन्सफर करून २३ हजाराची रक्कम काढून घेतली. अशी एकूण ६३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सदर शेतकऱ्याने १ मार्च रोजी फिर्याद दिल्याने अनोळखी व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे पोहेका कैलास करवंदे हे करत आहे.