Mon, Jul 22, 2019 01:07होमपेज › Aurangabad › अंबाजोगाई बसस्थानकासाठी तीन कोटी

अंबाजोगाई बसस्थानकासाठी तीन कोटी

Published On: Feb 06 2018 1:43AM | Last Updated: Feb 05 2018 11:14PMकेज : प्रतिनिधी

गेल्या पंचवीस वर्षार्ंपासून रखडेल्या अंबाजोगाई  बसस्थानकाच्या नुतन इमारतीच्या बांधकामास तीन कोटी रुपयांचा तर मुकुंदराज उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी पाच कोटी रुपयांचा निधी आ.प्रा.संगीता ठोंबरे यांनी शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. मुकुंदराज उद्यानासह अंबाजोगाई बसस्थानकास आ. ठोंबरे यांनी सोमवारी भेट देऊन पाहणी केली. 

अंबाजोगाई शहरातील बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून घेतल्याने राज्य परिवहन महामंडळाने बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या बांधकामास लवकरात लवकर सुरुवात करण्यासाठी नियोजित इमारतीचे रेखाचित्र लवकरात लवकर मागवले आहे.