Mon, Aug 26, 2019 15:02होमपेज › Aurangabad › प्रकल्पाच्या पाटाचे पाणी शेतात घुसले; पाच एकर कपाशीचे नुकसान

प्रकल्पाच्या पाटाचे पाणी शेतात घुसले; पाच एकर कपाशीचे नुकसान

Published On: Jul 23 2019 10:33PM | Last Updated: Jul 24 2019 1:39AM
पिशोर ः प्रतिनिधी 

शनिवारी झालेल्या मुळधार पावसाने पिशोर स्थानिकांसह शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. यातच पिशोर येथील गट नंबर ३४५ मधील बाबासाहेब परभत जाधव या शेतकऱ्याच्या शेतात अंजना पळशी प्रकल्पाच्या पाटाचे पाणी घुसल्याने सुमारे पाच एकर शेतातील कपाशी पीक पाण्याखाली गेले. यामुळे सदर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले.

जाधव यांनी सिंचन विभागाच्या चुकीच्या कामामुळे माझ्या शेतात दरवर्षी पाणी साचत असून शनिवारी मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. तसेच पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. त्यानंतर दि.२३ रोजी तब्बल ५० तासानंतर पाठबंधारे विभागला जाग आली. बाबासाहेब जाधव यांच्या शेतात पाहणी केली. त्यावेळी शेतात दरवर्षी होणारी नुकसान हे डाव्या कालव्यात तुंबलेल्या पाण्याने होते. डाव्या कालव्यात प्रकल्पातून सोडलेले पाणी किंवा त्यात पावसाने जमा होणारे पाणी यामुळे किमान पाच एकरावरीत पीक नष्ट होते. याच्यावर शासनाने काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी बाबासाहेब जाधव केली.  जाधव यांच्या नुकसानाची पहाणी करण्यासाठी उपविभागीय अभियंता रवींद्र ढापणे, शाखा अभियंता विजय पाखले,कालवा निरीक्षक तुकाराम जाधव,ऐ. बी.मनगटे व शेतकरी उपस्थित होते.