Tue, Jul 16, 2019 09:51होमपेज › Aurangabad › ट्रकने दुचाकीला उडविले

ट्रकने दुचाकीला उडविले

Published On: Dec 13 2017 2:34AM | Last Updated: Dec 13 2017 2:34AM

बुकमार्क करा

अजिंठा : प्रतिनिधी

मालट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना सोमवारी (दि.11) दुपारी 4 वाजेच्या सुमारास औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील वाघूर नदीच्या पुलाजवळ घडली.

शेख नसीब शेख जिलानी (60, रा. चिंचोली लिंबाजी, ता. कन्नड) असे मृताचे नाव आहे. तर त्यांची पत्नी जाकेराबी नसीब शेख या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना औरंगाबाद पाठविण्यात आले आहे.

अजिंठा येथील आपल्या नातेवाइकांना भेटून हे जोडपे मोटारसायकलने (एमएच 20 बीएस 6873) आपल्या गावाकडे येत होते. औरंगाबाद-जळगाव महामार्गावरील वाघूर नदीच्या पुलाजवळील पेट्रालपंपानजिक आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला मालट्रकने (क्र. एमएच26, ए.डी. 2452) जोराची धडक दिली. यात शेख नसीब हे जागीच ठार झालेत तर त्यांची पत्नी जाकेराबी गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी औरंगाबाद पाठविण्यात आले आहे. अपघाताची नोंद अजिंठा पोलिस ठाण्यात घेण्यात आली असून ट्रक व चालक सोमनाथ बळीराम पवार (रा.हर्सूल, औरंगाबाद) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.