Fri, Mar 22, 2019 01:43
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › प्लास्टिक बंदीनंतर कचर्‍यात 25 टन घट

प्लास्टिक बंदीनंतर कचर्‍यात 25 टन घट

Published On: Aug 08 2018 1:47AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AMऔरंगाबाद ः प्रतिनिधी

प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीपासून शहरातील रोजच्या कचर्‍यात सरासरी 20 ते 25 टनाची घट झाली आहे. प्लास्टिक वापराचे प्रमाण कमी झाल्यामुळेच ही घट झाल्याचा दावा महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. दुसरीकडे मागील दीड महिन्यात मनपा प्रशासनाने प्लास्टिक कॅरिबॅग बाळगणार्‍या 148 जणांवर कारवाई करून तीन लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

शहरात रोज सरासरी 450 टन कचरा निघतो. या कचर्‍यात कॅरिबॅगचे प्रमाण मोठे असते. ही परिस्थिती सर्वच शहरांत असल्यामुळे राज्य सरकारने 23 जूनपासून राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली आहे. पालिकेने प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीसाठी 38 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. हे कर्मचारी दुकानांमध्ये जाऊन तपासणी करतात आणि कॅरिबॅग तसेच बंदी असलेल्या प्लास्टिकच्या इतर वस्तू आढळल्यास जागेवर दंड आकारतात. मागील दीड महिन्यात या कर्मचार्‍यांनी शहरातील 2220 दुकानांची तपासणी केली आहे. त्यातील 248 जणांना दंड आकारण्यात आला. तसेच त्यांच्याकडून 478 किलो प्लास्टिक जप्त केले आहे. दरम्यान, प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीमुळे शहरात प्लास्टिक वापराचे आणि पर्यायाने कचर्‍यातील प्लास्टिकचे प्रमाण कमी झाल्याचा दावा मनपाने केला आहे.