Wed, Jul 17, 2019 08:15होमपेज › Aurangabad › नवविवाहित जोडप्यांना यंदा अधिकमासाची पर्वणी

नवविवाहित जोडप्यांना यंदा अधिकमासाची पर्वणी

Published On: Dec 08 2017 1:57AM | Last Updated: Dec 08 2017 1:57AM

बुकमार्क करा

औंढा नागनाथ : प्रभाकर मेथेकर

1 जानेवारी 2018 रोजी नवीन वर्षाची सुरूवात होत असली तरी मराठी वर्षाची सुरुवात चैत्र शुक्‍ल पक्ष प्रतिपदा रविवारी शके 1940 रोजी गुढीपाडव्यानेच होते. दर तीन वर्षांनी अधिकमास किंवा पुरुषोत्तम मास येतो.

या वर्षी वैशाख संपताच अधिक ज्येष्ठ मास येत असल्याने तुलसी विवाहापासून किंबहुना गेल्या अधिकमासापासून नवविवाहितांना अधिकमासाची पर्वणी राहणार आहे. या वर्षी चक्‍क फळांचा राजा आंब्याच्या मोसमात येणारा अधिकमास नवविवाहितांसह पाहुणे मंडळींनाही चंगळीचा जाणार आहे. 11 नोव्हेंबर 2017 पासून सुरू झालेले विवाह मुहूर्त 14,15,21,23,25,28,29 नोव्हेंबर, 3,4,10,11,12 डिसेंबर 2017पुढे पौष महिन्यात शुक्‍लाचा असला तरी 10, 20,21,23,26,27,28,31 डिसेंबर 2017 च्या विवाह तिथी तर 2018 च्या 1,5,7,8,9,10,12,18,19,22,23,27 जानेवारी, पुढे फेबु्रवारीत 2,3,4,5,7,8,9,11,18,19,20,21,24,25 तर मार्च मधील 3,4,5,6,8,12,13,14 या वर्षाच्या गुढीपाडव्यापूर्वीच्या विवाहतिथी आहेत. पुढे चैत्र महिन्यात मार्च 19,20,23,28,30, एप्रिलमध्ये 1,2,4,6,8,11 या तिथी फक्‍त रूईकरांच्या पंचागामध्ये दर्शविल्या आहेत. पुढे वैशाख महिन्यात एप्रिल19,20,24,25,26,27,28,30, मे महिन्यात 1,2,4,6,7,8,9,11,12 अशा विवाह तिथीची रेलचेल आहे. 16 मे 2018 पासून 13 जून 2018 पर्यंत अधिक ज्येष्ठ मास असल्याने विवाह मुहूर्त लांबणीवर गेले आहेत.

हिंदू संस्कृतीप्रमाणे अधिकमासात विवाह मुहूर्त नसतात. या काळात किंबहुना अधिकमासात महिनाभर तांबूलदान दिल्यास सौभाग्यप्राप्‍ती, देवापुढे अखंड दीप लावल्यास लक्ष्मीप्राप्‍ती, पूर्ण महिनाभर अनारसे दान पुण्यप्रद समजले जाते. तांदूळ, गहू, तेल, तूप, हळद, कुंकू, धृतकुंभ, उडीद, तीळ, नवे भांडे, श्रीफळ दान इत्यादी दान पुण्यप्रद मानले जाते. या काळात शक्यतो नवीन कामे केल्या जात नाहीत.

धोंड्याची पर्वणी
अधिकमासात नवदाम्पत्यांना अधिक महत्त्व प्राप्‍त होते. धोंडे जेवणासह त्यांना सोने,चांदी, वस्त्र अशा प्रकारात दान देवून सन्मान केल्या जातो. यावर्षी अधिकमास हा चक्‍क आंब्याच्या हंगामात येत असल्याने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. धोंडे जेवणासह मनसोक्‍त रसाळीचा आनंद नवविवाहितांसह पाहुणे मंडळींना मिळणार असल्याने वेगळीच अनुभूती येणार आहे. अधिकमास हा ज्येष्ठ महिन्यात आल्यामुळे उशिरा जुळलेले विवाह लांबणीवर एक महिना उशिरा लागणार आहेत. या काळात पावसाळा सुद्धा सुरू होण्याची शक्यता असल्याने बहुतांश विवाह लांबणीवरच होणार आहेत. एकंदर अधिकमासाची पर्वणी राहणार आहे.