Thu, Mar 21, 2019 15:25होमपेज › Aurangabad › बाबा मी चाललो; परत कधीच भेटणार नाही

बाबा मी चाललो; परत कधीच भेटणार नाही

Published On: Mar 07 2018 2:43AM | Last Updated: Mar 07 2018 2:43AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

तो सलीम अली सरोवराच्या काठावर गेला...  सुरुवातीला त्याने सेल्फी काढले... नंतर ‘बाबा मी चाललो, यानंतर मी तुम्हाला कधीही भेटणार नाही. मला शोधायचे असेल तर इथेच शोधा’ असा स्वतःचा व्हिडिओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आणि मोबाइल दुचाकीच्या डिक्‍कीत ठेवला. त्यानंतर त्याने सरोवरात उडी घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी 3 वाजता बेपत्ता झालेल्या तरुणाची दुचाकी सलीम अली सरोवराच्या काठावर आढळून आल्यावर मंगळवारी (दि. 6) सकाळी 10 वाजता हा प्रकार समोर आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाच तास शोध मोहीम राबवून सरोवरातून मृतदेह बाहेर काढला. 

आदेश कचरू खरात (22, रा. फुलेनगर, उस्मानपुरा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो चौका (ता. फुलंब्री) येथील रामदास आठवले महाविद्यालयात बी. एस्सी. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदेशची सध्या परीक्षा सुरू होती.

त्यासाठी सोमवारी सकाळी 10.30  बाबा मी चाललो ... वाजता तो चौका येथे गेला. दुपारी शहरात आल्यावर तो आईसोबत सिटी चौक भागात खरेदीसाठीही गेला. तेथे त्याने आईसोबत सेल्फी काढले; परंतु दुपारी 3 वाजेनंतर तो बेपत्ता झाला. वडिलांसह नातेवाइकांनी त्याच्याशी संपर्क करण्यासाठी अनेकदा फोन लावले; परंतु त्याने एकदाही मोबाइल उचलला नाही. रात्री उशिरापर्यंत त्याची शोधमोहीम सुरूच होती; परंतु काहीही पत्ता लागला नाही. अखेर मंगळवारी सकाळी नातेवाइकांनी उस्मानपुरा ठाणे गाठून आदेश बेपत्ता झाल्याची नोंद केली. त्यावर सहायक फौजदार उपेंद्र कुत्तुर हे अधिक तपास करीत होते. 

अन् विपरीत घडले..!

आदेश खरात हा अतिशय शांत स्वभावाचा होता. सैराट सिनेमानंतर त्याला नातेवाइकांनी परशा म्हणायला सुरुवात केली होती. त्याच्या पश्‍चात आई-वडील, तीन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्याचे वडील महापालिकेत ठेकेदारी व्यवसाय करतात. सोमवारी त्याने आई आणि बहिणींसोबत सेल्फी काढल्यानंतर आईने त्याच्या वडिलांना फोन करून ही माहिती दिली होती; पण आदेश सर्वांना सोडून जाईल, याचा साधा कोणी विचारही केला नव्हता.