Tue, Jul 23, 2019 01:58होमपेज › Aurangabad › अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, २ ठार, १ गंभीर  

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, २ ठार, १ गंभीर  

Published On: Feb 07 2018 3:38PM | Last Updated: Feb 07 2018 3:38PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

येथील दौलताबाद  रस्त्‍यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्‍याने झालेल्‍या अपघातात दोन तरूण ठार झाले तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. सनी उर्फ शुभम रमेश राउत (वय, २२, रा.न्यू नंदन कॉलनी, औरगाबाद ) आणि राधे उर्फ श्रीकांत शीवाजी हिवाळे (वय, २४, रा. पडेगाव) अशी मृतांची नावे आहेत. तर, आकाश रमेर सोनावणे (वय, २३, माजी सैनिक कॉलनी, पडेगाव) असे जखमीचे नाव आहे. जखमीला उपचारासाठी घाटी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मंगळवारी मध्यरात्री पार्टीवरून परत जात असताना पुढील वाहनाला ओव्हरटॅक करत असताना समोरून येणाऱ्या वाहनाने दुचाकीला (क्र. एम. एच. २०, २४५९) जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. स्‍थानिक नागरिकांनी जखमींना उपचारासाठी घाटी रूग्‍णालयात  दाखल केले. मात्र, तपासणी करून डॉक्‍टरांनी सनी आणि राधे या दोघांना मृत घोषीत केले. जखमी आकाशवर उपचार सुरु असून, त्‍याची प्रकती चिंताजणक असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 

याबाबत छावनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक अतुल ठोकळे करत आहेत.