Sun, Mar 24, 2019 22:55
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › अपघातात पत्नी ठार, पती जखमी

अपघातात पत्नी ठार, पती जखमी

Published On: Mar 05 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 1:23AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

कामगारांची वाहतूक करणार्‍या सवेरा ट्रान्सपोर्टच्या बसने अचानक वळण घेऊन दुचाकीस जोराची धडक दिल्याने या अपघातात पत्नी जागीच ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पंढरपूर येथे घडला. या विषयी पोलिसांनी सांगितले की, समाधान हिंमतराव सोन्ने (34 रा. बोरगाव ह.मु. जयभवानीनगर, बजाजनगर) यांना फुलंब्री येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी जायचे असल्याने रविवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास त्यांनी दोन्ही मुलांना घरी ठेवले. मित्राच्या दुचाकीवरून (एमएच 20 डीयु-6149 ) ते पत्नी सविता सोन्ने (32) यांच्यासह लग्नासाठी बजाजनगरातून निघाले होते. मोरे चौकातून पुढे फुलंब्रीकडे जात असताना पंढरपूर येथील बजाज विहारजवळ रांजणगावकडे जाणार्‍या सवेरा ट्रॉन्सपोर्टच्या बसने अचानक वळन घेऊन त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरून खाली पडल्याने सविता सोन्ने त्यांच्या डोक्याला तर समाधान यांच्या दोन्ही हातांना मार लागला. अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिसांनी जखमींना 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी सविता सोन्ने यांना तपासून मृत घोषित केले तर समाधान सोन्ने यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कैलास पारधे यांनी दिलेल्या जवाबावरून बसचालकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.