Tue, Apr 23, 2019 19:55होमपेज › Aurangabad › दुचाकी खांबाला धडकून तरुण ठार

दुचाकी खांबाला धडकून तरुण ठार

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 12:46AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

घरातील मुलांना सोडून परत जाताना भरधाव दुचाकी रस्त्यावरच्या दुभाजकाच्या खांबाला धडकून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 16) सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास हडकोतील गोदावरी शाळेसमोर घडला. शादमान शाहेद अन्वर काझी (16, रा. छत्रपतीनगर, हडको, एन-12) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शादमान शाहेद हा शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आपल्या घरातील लहान मुलांना दुचाकी  (एमएच 20 बीयू 4892) वर नेहमीप्रमाणे हडको परिसरातच असलेल्या एका शाळेत सोडण्यासाठी गेला होता. मुलांना सोडून तो परत घराकडे जात होता. 

यावेळी तो गोदावरी शाळेसमोरून जात असताना अचानक एकजण समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्न शादमानचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी दुभाजकाच्या खांबाला धडकली. या अपघातात शादमान हा गंभीर जखमी होऊन पडला होता. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार कैलास फुले हे तपास करत आहेत.