Fri, Sep 21, 2018 05:58होमपेज › Aurangabad › आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा 

आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा 

Published On: Jul 30 2018 9:12PM | Last Updated: Jul 30 2018 9:12PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आमदारांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच आहे. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आज (दि. ३० जुलै)आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा, धनगर आणि मुस्लीम आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांनी  राजीनामा दिला आहे.

अब्‍दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्‍ह्‍यातील सिल्‍लोड तालुक्‍यातचे आमदार आहेत. त्‍यांनी आज सांयकाळी आपल्‍या आमदारकीचा राजीनामा दिला.