Wed, May 27, 2020 09:09होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : प्रशासनाकडूनच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

औरंगाबाद : प्रशासनाकडूनच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

Last Updated: Apr 01 2020 5:11PM

जि. प. प्रवेशद्वारासमोर मुलाखतीसाठी उमेदारांनी केलेली गर्दी.औरंगाबाद : पुढारी ऑनलाईन 

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जगातील सर्वच देश प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली. त्याचबरोबर राज्यातही मोठ्याप्रमाणावर उपाययोजना आखल्या जात असून त्या राबविल्याही जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने खबरदारीचे पावले उचलत आरोग्य विभागात ५२७ कंत्राटी पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याप्रमाणे बुधवारी मुलाखतीसाठी उमेदवारांना बोलावण्यात आले होते. पण यावेळी कोरोनाच्या प्रतिबंधातील सोशल डिस्टन्सिंगचा पुर्ण फज्जा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून उडाल्याचे पाहायला मिळाले.

औरंगाबाद पोलिसांकडून गाण्यांतून कोरोना जनजागृती

कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी तसेच भविष्यात कोणत्याही आरोग्य विषयक अडचणी येऊ नयेत यासाठी कंत्राटी स्वरूपाची पदे भरली जाणार होती. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून अपेक्षित शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर अटी व शर्तींविषयी सविस्तर जाहिरात प्रशासनाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केली होती. 

औरंगाबाद : जीवनावश्यक वस्तूंची अव्वाच्या सव्वा दराने विक्री

त्याप्रमाणे विविध पदांसाठीच्या थेट मुलाखती १ एप्रिल ते ८ एप्रिल या कालावधीत शासकीय सुट्या वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात होतील, असे कळवण्यात आले होते. त्यामुळे आज सकाळी जि. प. प्रवेशद्वारासमोर एकच गर्दी झाली होती. तेव्हा आज फक्त वैद्यकीय अधिकारी यांच्याच मुलाखती होतील, असे सांगण्यात आले. तसेच याबाबत आधीच माहिती संकेतस्थळावर टाकल्याचेही अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले. 

कंत्राटी तत्त्वावर भरावयाची पदे 
वैद्यकीय अधिकारी -१७०
आरोग्यसेवक महिला- १८७ 
आरोग्यसेवक पुरुष- ६० 
स्टाफ नर्स- ११०