Thu, Nov 15, 2018 23:15होमपेज › Aurangabad › मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्‍महत्‍या(व्हिडिओ)

मराठा आरक्षणासाठी आणखी एकाची आत्‍महत्‍या (व्हिडिओ)

Published On: Aug 02 2018 8:27PM | Last Updated: Aug 02 2018 8:27PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्‍या १५ दिवसांपासून राज्‍यभरात आंदोलने सुरु आहेत. आरक्षणाच्या मागीसाठी आतापर्यंत चार ते पाच जणांनी आत्‍महत्‍या केल्‍याच्या घटना ताज्‍या असताना आज शहरातील चौधरी कॉलनी येथील २१ वर्षीय तरूणाने आत्‍महत्‍या केली आहे. आत्‍महत्‍या करताना या तरूणाने चिठ्ठी लिहिली आहे. या चिठ्ठीत त्‍याने आत्‍महत्‍येचे कारणही लिहिले आहे. 

उमेश एंडाईत असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरूणाचे नाव असून, त्‍याच्या आत्‍महत्‍यंनेतर शहरात प्रचंड तणावाची परिस्‍थिती निर्माण झाली आहे. जालना रोडवर रास्ता रोको करण्यात आला असून, आंदोलकांनी रस्‍त्‍यावर टायर पेटवून शासनाचा निषेध केला आहे.  

'मी माझ्या मम्मी-पप्पांची क्षमा मागतो, मला त्यांनी शिकवले, पण मी त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, माझं शिक्षण अपूर्णच राहिले, बी. एस्सी. होऊनही नोकरी मिळत नाही, मी मराठा आहे म्हणून कि काय ?' अशा आशयाची चिठ्ठी त्‍याने आत्‍मत्‍येपूर्वी लिहिली आहे.