Sun, Aug 25, 2019 03:37होमपेज › Aurangabad › तरुणाचा खून; आरोपींना कोठडी

तरुणाचा खून; आरोपींना कोठडी

Published On: Dec 20 2017 1:38AM | Last Updated: Dec 20 2017 12:35AM

बुकमार्क करा

औरंगाबाद ः प्रतिनिधी

पुरात वाहून गेल्याचा बनाव करून तरुणाचा खून करणार्‍या चौघा आरोपींना शुक्रवारपर्यंत (22 डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक प्रकाश रघुनाथ घुगरे यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, मृत कृष्णा एकनाथ कोरडे (22) याच्या अकस्मात मृत्यूची नोंद एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये मृताच्या डोक्याला जखमा आढळल्या व मृताच्या नातेवाइकांनी घातपाताची शंका उपस्थित केली होती. त्यानंतर तपासामध्ये पोलिसांची दिशाभूल करून आरोपी नारायण रतन गरंडवाल, राजू तुळशीराम पवार, समाधान गणेश कालभिने, सुनील रमेश घोगरे (21, सर्व रा. भारतनगर, बीड बायपास, औरंगाबाद) यांनी षड्यंत्र रचून 16 सप्टेंबर 2017 रोजी तरुणाचा खून केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी चौघा आरोपींना सोमवारी (18 डिसेंबर) अटक करून मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने चौघा आरोपींना शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.