Tue, Mar 19, 2019 03:58होमपेज › Aurangabad › लोकशाही कॉलनीत कामगाराची आत्महत्या

लोकशाही कॉलनीत कामगाराची आत्महत्या

Published On: May 24 2018 1:31AM | Last Updated: May 24 2018 12:15AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

अज्ञात कारणावरून एका कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी मुकुंदवाडी परिसरातील लोकशाही कॉलनी येथे उघडकीस आली. दिलीप सीताराम लक्‍कस (43, रा. लोकशाही कॉलनी) असे आत्महत्या करणार्‍या कामगाराचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप लक्‍कस हे एका वाईन शॉपमध्ये कामाला होते. नेहमीप्रमाणे ते मंगळवारी रात्री कामावरून परत आले होते. त्यानंतर ते जेवण करून खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मध्यरात्री त्यांनी घरातील छताच्या पाईपला दोरी बांधून गळफास घेतला. हा प्रकार सकाळी सहा वाजेच्या सुमारास घरातील लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले. त्यांनी ही माहिती मुकुंदवाडी पोलिसांना देऊन 

लक्‍कस यांना घाटीत आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. सर्व काही व्यवस्थित असताना लक्‍कस यांनी आत्महत्या का केली, असा प्रश्‍न त्यांच्या नातेवाइकांनाही पडला आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे. विशेष म्हणजे मुलीचे लग्न गेल्या महिन्यातच झाले आहे. 

त्यामुळे ते एका मोठ्या जबाबदारीतून मुक्‍त झाले होते. या प्रकरणी मुकुुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार एस. एन. अहिरकर तपास करत आहेत.