Wed, Jun 26, 2019 03:15होमपेज › Aurangabad › आणि प्रेमीयुगलाला ‘सैराट’ होण्यापासून थांबवले!

आणि प्रेमीयुगलाला ‘सैराट’ होण्यापासून थांबवले!

Published On: Dec 24 2017 10:50AM | Last Updated: Dec 24 2017 10:50AM

बुकमार्क करा

गंगाखेड : प्रतिनिधी

तालुक्यातील पिंपळदरी येथील नातेवाईक असलेल्या एका  युवती व युवकाचे अनेक दिवसांपासून एकमेकांवर प्रेम होते, पण या  प्रकरणात मुलाच्या आई-वडिलांकडून विरोध होत असल्यामुळे या प्रकरणी स्वतः मुलीने महिला दक्षता समितीची मदत घेऊन विवाह लावून देण्यास भाग पाडले.

तालुक्यातील पिंपळदरी येथील विद्यासागर मारुती अरसले व  दत्ता लक्ष्मन महात्मे यांच्या प्रेमाला मुलाच्या आई- वडिलाकडून विरोध होत असल्यामुळे ते पळून जाण्याच्या विचारात होते. सदरील मुलीने याविषयी महिला दक्षता समितीच्या  सुवर्णमाला  मोतीपवळे यांना संपर्क साधून माहिती दिली. त्यांनी मुलीला सोबत घेऊन पिंपळदरी गाठले.

यावेळी मुलाच्या आई-वडिलांची समजूत घालून त्या दोघांचा विवाह लावून  देण्याचा प्रस्ताव मांडताच पालकांनी साफ नकार दिला. त्यावर पोलिस निरीक्षक अविनाश खंदारे यांना या विषयी पूर्ण माहिती सांगितली. पोलिस निरीक्षकांनी या करणातील मुलांवर 376 नुसार गुन्हा दाखल करण्याचे फर्मान सोडताच सदरील मुलाच्या आई-वडिलांनी या विवाहास होकार दिला. यानुसार दि.22  डिसेंबर रोजी कृष्ण श्रेया मंगल कार्यालयात मुलीचे आई वडील, मामा, मुलाचे वडील व चुलता, मामा, आजोबा, महिला दक्षता समितीच्या सदस्या आदींनी या प्रेमीयुगुलाचा विवाह लावून दिला.