Tue, Nov 20, 2018 23:40होमपेज › Aurangabad › संशय घेतला म्हणून पतीने पत्नीलाच बदडले

संशय घेतला म्हणून पतीने पत्नीलाच बदडले

Published On: Jan 25 2018 1:17PM | Last Updated: Jan 25 2018 3:25PMऔरंगाबाद : प्रतिनिधी

महिलेस घरी का बोलावले अशी पत्नीने विचारणा करताच पतीने महिलेच्या मदतीने पत्नीस काठीने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगरात घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संगीता रामा वाघमोडे (31, रा. सिडको, वाळूजमहानगर-1) हिचा 9 वर्षांपूर्वी रामा वाघमोडे याच्यासोबत विवाह झाला आहे. त्यांना 5 वर्षांची मुलगी आहे. 

दोन वर्षांपासून रामाचे याच भागात राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचे संगीताला कळाले. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास एक महिला त्यांच्या घरी आली.

तिला घरी का बोलावले, असे संगिताने रामाला विचारले. त्यावर 'तू माझ्यावर संशय घेते का,' असे म्हणत रामा व घरी आलेल्या महिलेने संगीताला मारहाण सुरू केली. या वेळी रामाने संगीताला काठीने  मारहाण केली. 'तू आताच येथून निघून जा,' असे म्हणत संगीताला मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.