Thu, Jun 20, 2019 00:35होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : पतीवर जादूटोणा करून पत्नीवर अत्याचार

औरंगाबाद : पतीवर जादूटोणा करून पत्नीवर अत्याचार

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 12:54AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पतीवर जादूटोणा करून त्याला चांगले करण्याचे आमिष दाखवीत महिलेवर अत्याचार करून दागिने लांबविणार्‍या एका भोंदूबाबास नारेगावातून पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई जालना पोलिसांनी सिडको एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. शेख रहेमद शेख अब्दुल (40, रा़  घाटनांदूर, बीड, ह़  मु़  नारेगाव) असे या भोंदूबाबाचे नाव आहे़ 

जालना येथे राहणार्‍या एका महिलेचा पती हा भोळसर आहे. तिने त्याच्यावर विविध रुग्णालयात उपचार केले, मात्र तो ठीक होत नव्हता. दरम्यान पीडित महिलेच्या  सासूने जादूटोण्याचा इलाज करण्यासाठी भोंदूबाबा शेख रहेमद बाबत माहिती दिली़  महिलेने त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने पतीला चांगले करण्याची थाप मारली. तसेच तुझ्या पतीला भूतबाधा झाली असून त्यासाठी विशेष पूजा करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर पतीच्या अंगातील भूतबाधा काढण्यासाठी घरात गोल रिंगण करून पूजा मांडली़  रिंगणात दोघा पती-पत्नीला बसवून काही तरी ज्वलनशील पदार्थ टाकून त्यावर कपडा टाकला़

ज्वलनशील पदार्थामुळे कपड्याने पेट घेतला़  त्यावर ही भूतबाधा भयंकर असल्याचे सांगून विविध अघोरी प्रकार वर्षभर करत होता. पीडितेला भूत उतरविण्याठी घरातील दागिन्यांची पूजा करावी लागेल अन्यथा तुझ्या पतीचा मृत्यू होईल अशी भीती दाखविली. त्यामुळे त्याच्या सांगण्यानुसार पीडिता एक लाख 90 हजार रुपये रोख व दागिने घेऊन औरंगाबादमधील नारेगाव येथील घरी आली. पीडिता पूर्ण जाळ्यात आल्याचे पाहून रहेमदने पीडितेला चार दिवस नारेगाव येथे घरातील खोलीवर ठेवून तिला गुंगीचे औषध देऊन वारंवार अत्याचार केले़  हा प्रकार रहेमदच्या पत्नीच्या लक्षात आल्यानंतर ती घरातून निघून गेली़  त्यामुळे भांडा फुुटणार हे लक्षात येताच शेखनी पीडितेला सिडको बसस्थानकावर नेऊन सोडले़  पीडितेने जालन्याला जाऊन सर्व प्रकार नातेवाईकांना सांगून 6 ऑगस्ट रोजी  सदर बाजार ठाण्यात जाऊन भोंदूबाबा शेख रहेमदविरुद्ध अत्याचार व जादूटोणाविरोधी कायद्यानुसार तक्रार दिली़  गुन्हा दाखल होताच सदर बाजार पोलिसांनी नारेगाव येथून शेख रहेमदला ताब्यात घेऊन दागिने व रोख रक्कम जप्त केली.