Wed, Nov 21, 2018 22:13होमपेज › Aurangabad › पत्नीच्या पदाचा पतीकडून गैरवापर 

पत्नीच्या पदाचा पतीकडून गैरवापर 

Published On: Dec 29 2017 1:53AM | Last Updated: Dec 29 2017 1:40AM

बुकमार्क करा
पैठणः प्रतिनिधी

पत्नीकडे असलेल्या जि. प. सदस्य पदाचा गैरवापर करत स्वतःच्या नावापुढे हे पद टाकून होर्डिंग, सोशल मीडिया, तसेच वर्तमानपत्राच्या माध्यमातून स्वतःला मिरविणे एका पजीराजाचा चांगलेच महाग पडण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आलेल्या तक्रारीवरून विभागीय आयुक्‍तांनी जिल्हा परिषदेच्या सीइओंना सदर पतीराजाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. असे प्रकार सर्वत्र सर्रास होतात, मात्र कुणी तक्रार करत नाही, मात्र याप्रकरणी तक्रार करण्यात आल्याने इतर पुढार्‍यांना जरब बसणार आहे.   

पैठण तालुक्याच्या आपेगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेनेतर्फे शिल्पा कापसे या निवडून आलेल्या आहेत, परंतु जि. प. सदस्याचे पती ज्ञानेश्‍वर कापसे हे आपल्य पत्नीच्या पदाचा गैरवापर करीत असल्याचे एका तक्रारीवरून समोर आले आहे. पत्नीच्या पदाचा गैरवापर करून स्वतःचा वाढदिवस साजरा करणे, वर्तमान पत्रातील जाहीरात, सोशल मीडिया व होर्डिंग्जच्या माध्यमातून स्वतः ला मिरविणे, हे प्रकार सदर पतीराज करत आहेत.

दरम्यान, या सर्व नियमबाह्य प्रकाराची भाजपचे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ शिंदे यांनी उपरोक्त पुराव्यानिशी विभागीय आयुक्‍तांकडे 15 डिसेंबर लेखी तक्रार नोंदविली. जनतेची दिशाभूल करीत महिला आरक्षणाचा संविधानिक अवमान करत असल्याचे तक्रारीत नमूद करत या व्यक्‍तीवर स्थानिक स्वराज्य संस्था अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना  या प्रकरणी सदर पतीरजाची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश आयुक्‍तांनी दिले आहे. 

दरम्यान, महिलांकडून पदाचा नातेवाइकांकडून होणारा हस्तक्षेप पैठण तालुक्यात वाढला असून भाजपचे तालुका उपाध्यक्ष शिंदे यांनी या संदर्भात आपेगाव जि. प. गटातील प्रकार चव्हाट्यावर आणल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.