Sun, May 19, 2019 12:06
    ब्रेकिंग    होमपेज › Aurangabad › वाळूजकरांना पाणीटंचाईच्या झळा

वाळूजकरांना पाणीटंचाईच्या झळा

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 07 2018 12:50AMवाळूज : प्रतिनिधी

वाळूजकरांना पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या असून गावांत अनेक भागांतील नळांना तब्बल 13 दिवसांनी पिण्याचे पाणी येत आहे. त्यातही दूषित पाणी पुरविण्याचे पाप जनतेच्या माथी अजून किती दिवस लादण्यात येणार? असा प्रश्‍नही येथे उपस्थित होत आहे. पाणीप्रश्‍नी नागरिक संतप्‍त भावना व्यक्‍त करताना दिसून येतात. ग्रामपंचायतीने पाणीप्रश्‍नावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी येथे जोर धरीत आहे.

वाळूजचा पाणीप्रश्‍न तसा गेल्या 30 वषार्र्ंपासून गाजतो आहे. गावचा कारभार हा ग्रामपंचायतमार्फत पाहण्यात येतो. त्यासाठी 6 प्रभागांसाठी एकूण 17 कारभारी त्या-त्या प्रभागाचे प्रतिनिधीत्व करतात. यापूर्वी येथे जायकवाडी धरणातून चांगल्या प्रकारचा स्वच्छ पाणीपुरवठा व्हायचा, मात्र पाणीबिल थकीतमुळे पाणीपुरवठ्याला ग्रहण लागून पुरवठाच बंद झाला आणि वाळूजकरांच्या तोंडचे पाणी पळाले. उद्योगनगरीमुळे गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून आजमितीला जवळपास 50 हजारांच्या आसपास गेली आहे. त्यातुलनेत गावाला पाणीपुरवठा करण्यात ग्रामपंचायत प्रशासनाच्या नाकात दम आल्याचे चित्र आहे. सध्या येथे तीन विहिरी व एमआयडीसीमधून पाणी पुरविले जाते. मात्र शुद्ध पाणी हे विहिरीच्या अशुद्ध पाण्यात मिसळून ते गावाला पुरविण्यात येते. त्यामुळे सर्वच पाणी अशुद्ध होत आहे.

Tags : Aurangabad, Water, scarcity, Waluj