Tue, Apr 23, 2019 06:18होमपेज › Aurangabad › गळती थांबविण्यासाठी जलकुंभाची दुरुस्ती

गळती थांबविण्यासाठी जलकुंभाची दुरुस्ती

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

रहेमानिया कॉलनीतील फत्तेसिंगपुरा जलकुंभाची गळती थांबविण्यासाठी वॉटर प्रुफिंग करण्यात येणार असल्याचे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी सांगितले. 

जुन्या शहरातील पाणीप्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे मनपाच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांकडून सतत ओरड होत होती. त्यामुळे जुन्या शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापौरांनी पाणीपुरवठा विभागाला आठ दिवसांची डेडलाईन दिली होती. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने जिन्सी आणि शहागंज जलकुंभावरील ताण कमी करण्यासाठी दहा वर्षांपासून बंद असलेला रहेमानिया कॉलनीतील जलकुंभ पुन्हा कार्यान्वित केला, परंतु त्याल गळती लागली आहे.

त्यामुळे परिसरातील नागिरकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या गळतीमुळे जलकुंभ पूर्ण भरता येत नसल्याचे चित्र आहे. लवकरच ही गळती थांबविण्यासाठी वॉटर प्रुफिंग करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चहल यांनी सांगितले.