Fri, Jul 19, 2019 18:33होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : पोटूळमध्ये आले ‘वॉटर एटीएम’

औरंगाबाद : पोटूळमध्ये आले ‘वॉटर एटीएम’

Published On: Jan 25 2018 9:39AM | Last Updated: Jan 25 2018 9:39AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

पन्नास पैशाचे नाणे चलनातून बाद झाले असले तरी पोटूळ ग्रामस्थांना त्याचा उपयोग होणार आहे. अवघ्या चाळीस पैशांध्ये पिण्यासाठी एक लिटर शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे.
पोटूळ ग्रामस्थांना ही शुद्ध पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे.

पोटूळ ग्रामपंचायत व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानच्या संयुक्‍त विद्यमाने पाच लाखांचा निधी एकत्रित करण्यात आला. या निधीतून गावात पाणी शुद्धीकरणाचा आर. ओ. फिल्टर प्रकल्प बसविण्यात आला. हा प्रकल्प ‘वॉटर एटीएम’च्या धरतीवर आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गावकर्‍यांना प्रत्येक महिन्याला 150 रुपये जमा करावे लागणार आहे. प्रत्येक दिवशी चाळीस पैशांप्रमाणे 20 लिटर पाणी प्रत्येक कुटुंबाला दिले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठानच्या पुढाकाराने गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शौचालयाचे काम सुरू झाले आहे. इयत्ता 1 ते 5 वर्ग असणार्‍या या शाळेत एकूण 36 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मिळालेल्या या दोन्ही सुविधाुंळे पोटूळ ग्रामस्थांना त्याचा लाभ झाला, तर अन्य सरकारी योजनांबद्दल लोकांध्ये असणारा अविश्‍वास कमी होण्यासाठी या प्रकल्पाचा फायदा होईल, असे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी सांगितले.