Fri, Apr 26, 2019 03:45होमपेज › Aurangabad › व्हिडिओकॉनमध्ये अघोषित काम बंद

व्हिडिओकॉनमध्ये अघोषित काम बंद

Published On: Jan 31 2018 2:02AM | Last Updated: Jan 31 2018 1:45AMबिडकीन : प्रतिनिधी 

हजारो कामागरांसह औरंगाबादच्या औद्योगिक वसाहतीचे भवितव्य अवलंबून असलेल्या व्हिडिओकॉन कंपनीच्या कामगारांना दिलेल्या सक्‍तीच्या रजा संपल्या आहेत, मात्र कामावर परतल्यावर गेल्या 3 महिन्यांचा पगार न झाल्याने सोमवारी (दि.29) सकाळी व्हिडिओकॉनमध्ये असलेल्या टेकर जे व्हिडिओकॉन सर्व्हिस सेंटर विभागाच्या कामगारांनी गेटवर काम बंद असा संप पुकारला आहे. 

जोपर्यंत सर्व पगार होणार नाही, तोपर्यंत कामगार कामावर जाणार नाही, असा पावित्रा कामगारांनी घेतला, तसेच टेकरचे एच.आर. प्रमुख मनोज चैनी यांना  आपल्या मागण्या स्पष्ट शब्दात सांगितल्या, चैनी यांनी तुम्ही काम सोडल्यास आम्ही पगार देऊ शकणार नाही, सध्या कंपनीकडे पैसे नाहीत, प्रत्येकांना दोन हजार रुपये देऊ बाकी असलेला पगार नंतर करू कामगारांनी  याला साप नकार देत काम बंद ठेवून गेट समोरच घोषणा बाजी करून धरणे धरून संप सुरू केला आहे. शुक्रवार(दि.19) पासून कंपनी पुन्हा सुरू झाली. गत 8 जानेवारीरोजी मेंटेनन्सचे कारण देत व्हिडिओकॉन कंपनीने आपल्या साडेसहा हजार कामगारांना 12 दिवसांची सक्‍तीची रजा दिली होती. त्याची मुदत 18  जानेवारी रोजी संपली होती. 45 हजार कोटींचे कर्ज डोक्यावर असलेली ही कंपनी आर्थिक डबघाईस आली आहे. हे वास्तव काही लपून राहिलेले नव्हते. व्हिडिओकॉनने आपल्या कामगारांना सुट्या दिल्यानंतर त्याचे थेट परिणाम औरंगाबादच्या तब्बल 200 लघुउद्योजकांवर पडले होते. त्या अनुषंगाने तब्बल 20 हजार कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली होती.

व्हिडिओकॉन ही कंपनी औरंगाबाद औद्योगिक वसाहतीत असलेल्या लघु उद्योजकांकडून महिन्याला तब्बल 60 कोटी रुपयांचा कच्चा माल विकत घेते. त्याचबरोबर या उद्योगांवर अप्रत्यक्षरित्या अवलंबून असलेल्या अनेक सेवा सुविधांवर सुद्धा गंभीर स्वरूपाचे परिणाम झाले आहेत.  परिणामी, औरंगाबाद औद्योगिक वसाहतीची घडी काही प्रमाणात विस्कटली आहे. त्यातच बरोबर बाराव्या दिवसानंतर पगार वेळेवर होत नसल्याने व्हिडिओकॅनमध्ये कामगारांना आता स्वत:हून अघोषीत बंद सुरू केला आहे, या मध्ये  हंगामी व  कार्यालयीन कामगारांचा अधिक समावेश आहे.