Wed, Apr 24, 2019 20:13होमपेज › Aurangabad › विद्यापीठ अभ्यास मंडळाची निवडणूक १७ फेब्रुवारीला

विद्यापीठ अभ्यास मंडळाची निवडणूक १७ फेब्रुवारीला

Published On: Jan 16 2018 2:16AM | Last Updated: Jan 16 2018 2:14AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अभ्यास मंडळाची निवडणूक 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली.  

विद्यापीठ प्रशासनाने अभ्यास मंडळ निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच घोषित केला. या निवडणुकीसाठी मंगळवारपासून (दि. 16) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. उमेदवारांना विहित नमुन्यांत स्वतः किंवा त्यांनी लेखी स्वरूपात प्राधिकृत केलेल्या व्यक्‍तीमार्फत अर्ज दाखल करता येतील. निळ्या शाईने भरलेले अर्जच स्वीकारण्यात येणार आहेत. 22 जानेवारी हा अर्ज स्वीकृतीचा अखेरचा दिवस आहे. 23 जानेवारी ते 27 जानेवारीदरम्यान दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होईल. विद्यापीठाच्या महात्मा फुले सभागृह किंवा व्यवस्थापन परिषद हॉलमध्ये ही प्रक्रिया पार पडणार आहे.

छाननीनंतर 27 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत पात्र व अपात्र उमेदवारी अर्जांची यादी जाहीर केली जाईल. 29 जानेवारी ते 30 जानेवारीदरम्यान पात्र व अपात्र अर्जांवरील आक्षेप नोंदविता येतील. आक्षेपावरील निर्णयानंतर एक फेब्रुवारी रोजी अंतिम पात्र उमेदवार यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रकाशित होईल. दोन फेब्रुवारी (सकाळी 11 ते दुपारी पाच) ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून याच दिवशी अंतिम उमेदवार यादी प्रसिद्ध केली जाणार असून 17 फेब्रुवारी रोजी मतदान होईल. 20 फेब्रुवारी रोजी मतमोजणी आणि निकालाची घोषणा होईल. सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे.