Thu, Jul 18, 2019 00:05होमपेज › Aurangabad › अनधिकृत सावकारांनी अनेकांना लावले देशोधडीला 

अनधिकृत सावकारांनी अनेकांना लावले देशोधडीला 

Published On: Feb 18 2018 1:55AM | Last Updated: Feb 17 2018 11:29PMमाजलगाव : सुभाष नाकलगावकर

माजलगाव तालुका सधन आसला तरी अनेक गरीब भूमिहीन, ऊसतोड कामगार, कष्टकरी लोक आहेत. याच लोकांचे शोषण करणार्‍या अनधिकृत सावकारांमुळे अनेकजण देशोधडीला लागल्याचे  माजलगाव तालुक्यात पहावयास मिळते.

माजलगाव तालुक्यात बोटावर मोजण्या पलिकडे नोंदणीकृत सावकार सोडले तर जागो जागी शहरी भागासह ग्रामीण भागात अनधिकृतपणे सावकारी करणारे सावकार अवाचे सव्वा व्याज लाऊन मजबूर व्यक्तीला व्याजाने पैसे देतात व त्याच जोशाने दाबदडप करत वसुलीही करतात. 

माजलगाव तालुक्यात सावकारांचा धंदा तेजीत सुरू असताना अनेक शेतकर्‍यांचे शेतात माल न पिकल्याने मुलीच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी लागणार्‍या पैशासाठी खासगी सावकाराशिवाय काहीच पर्याय राहिलेला नसतो म्हणून सावकार म्हणेल त्या मासिक व्याजदराने पैसे घेतला जातो. यासाठी प्रॉपर्टीचे खरेदीखतही लिहून घेतले जाते.  शेतकर्‍यांच्या अनेक आत्महत्या सावकारी तगाद्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सावकारी धंद्यात अनेक राजकारणी, अनेक पक्षाचे, संघटनेचे पदाधिकारी आपला हा सावकारी धंदा तेजीत चालवत आहेत. कोणी व्याज देत नसेल तर गुंडा करवी धमक्या देऊन आपले व्याजाचे पैसे वसूल करण्याचा फंडा या अनधिकृत सावकारांनी सुरू केला आहे.