Sat, Jul 20, 2019 09:17होमपेज › Aurangabad › पावसाळी अधिवेशन नागपूरला नेण्याची गरज काय? : उध्दव ठाकरे

पावसाळी अधिवेशन नागपूरला नेण्याची गरज काय? : उध्दव ठाकरे

Published On: Apr 19 2018 7:10PM | Last Updated: Apr 19 2018 7:21PMऔरंगाबाद : पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यंदाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला घेण्याची जोरदार तयारी करत आहेत. पण, यावरुन शिवसेनेने त्यांचे कान टोचले आहेत. उध्दव ठाकरे  यांनी पावसाळी अधिवेशन नागपूरलाच काशाला नेण्याची गरज आहे? त्यापेक्षा लोकहिताचे चांगले निर्णय घ्या असा सल्ला दिला. 

शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. जा दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी सरकारकडे विदर्भातील शेतकऱ्यांच्या जमीनी जशा निर्बंध मुक्त केल्या तशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्याही करा अशी मागणी केली. 

याचबोरबर औरंगाबाद मध्ये उद्भवलेल्या कचऱ्याच्या प्रश्नाबाबत महापौर आणि स्थानिक नेत्यांना हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचा आदेश दिला. तसेच उध्दव ठाकरेंनी औरंगाबादकरांची कचरा समस्येमुळे झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली.