Tue, May 21, 2019 12:07होमपेज › Aurangabad › आरटीई प्रवेश प्रक्रियेदरम्यान दोन शाळा आढळल्या बंद

आरटीई प्रवेश प्रक्रियेदरम्यान दोन शाळा आढळल्या बंद

Published On: Apr 10 2018 1:24AM | Last Updated: Apr 10 2018 1:10AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

आरटीई प्रवेश प्रक्रियेत वाळूज परिसरातील दोन शाळा बंद आढळल्या आहे, या शाळेत प्रवेशासाठी ज्या पालकांनी पहिला पर्याय दिला होता, अशा पालकांना आपल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश दुसर्‍या शाळेत करता येतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली.

बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. आरटीईअंतर्गत 2018-19 या वर्षांत 25 टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया 10 जानेवारीपासून सुरू झाली. जिल्ह्यातील 565 शाळांमध्ये एकूण 6 हजार 371 जागांवर आरटीईअंतर्गत प्रवेश देण्यात येत आहे. यात 11 हजार 121 विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेचा पहिल्या फेरीचा लकीड्रॉ काढण्यात आला.

शिक्षण विभागानेही पहिल्या फेरीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे. मात्र वाळूज परिसरातील दोन शाळा बंद आढळल्या आहे. त्यात केंब्रिज स्कूल व माउंट व्हॅली स्कूल या शाळांचा समावेश आहे. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी या शाळांचा पहिला संदर्भ दिला आहे.नियमानुसार, विद्यार्थ्याला दिलेल्या पहिला पर्याय असणार्‍या शाळेत जर त्याला प्रवेश मिळत असेल तर त्याला त्याच शाळेत प्रवेश घेणे अनिवार्य आहे अन्यथा तो त्या प्रवेश प्रक्रियेतून बाद होतो. बंद असलेल्या शाळांमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागले आहे त्यांना तीन दिवसांची मुदत वाढवून देण्यात येणार असून त्यांना पुढील पर्याय दिलेल्या दुसर्‍या शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल, असे जयस्वाल यांनी सांगितले.

Tags : Aurangabad, Two, schools,  found, closed, during, RTE, admission, process