Sat, Mar 23, 2019 12:39होमपेज › Aurangabad › कार दुभाजकाला धडकल्याने दोन ठार 

कार दुभाजकाला धडकल्याने दोन ठार 

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 25 2018 12:37AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

लग्‍नसमारंभासाठी आलेल्या नातेवाइकांची कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले. हा अपघात बुधवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास वाळूज औद्योगिक क्षेत्रात घडला. कृष्णा बुटे, मनोज शेडूते अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. 

विटावा येथील शीतलनगरात बुधवारी लग्‍नसोहळा होता. दुपारी विवाह सोहळा पार पडल्यानंतर रात्री कृष्णा रामभाऊ बुटे (40, रा. धावणी मोहल्‍ला, औरंगाबाद), मनोज भालचंद्र शेडूते (40, रा.इन्कम टॅक्स कॉलनी, जुना जालना), शिवाजी कुलथे (40, रा. वैजापूर) व सुभाष मुंडलिक (45, रा. मुस्तान चाळ, आझादनगर, ठाणे) हे चौघे कार (एमएच 21 एएक्स-0779) मधून सीएट कंपनीकडून विटावा येथे जात होते. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एल-4 मधील व्हेरॉकजवळ रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार दुभाजकाला धडकली.

भरधाव वेगात असल्याने कार दुभाजकाला धडकताच मोठा आवाज झाला. हा आवाज ऐकून  जवळच असलेल्या डॉ. दीक्षित यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला असलेले नानासाहेब बोर्डे, रमेश बोर्डे, सतीश बोडखे आदींनी धाव घेत कारमधील गंभीर जखमी दोघांना अ‍ॅपेरिक्षातून उपचारासाठी रवाना केले. उर्वरित दोघांना 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी कृष्णा बुट्टे यास तपासून मृत घोषित केले, तर मनोज शेडूते याचा उपचार सुरू असताना गुरुवारी (दि. 24) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. इतर दोघा जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.