Sat, Jan 25, 2020 08:25होमपेज › Aurangabad › औरंगाबादच्या ‘त्या’ मायालेकींचा विशाखापट्टणमचा प्रवास सुरू 

औरंगाबादच्या ‘त्या’ मायालेकींचा विशाखापट्टणमचा प्रवास सुरू 

Published On: Dec 11 2017 10:57AM | Last Updated: Dec 11 2017 10:57AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी 

महानगर पालिकेच्या प्राणिसंग्रहालयातील लक्ष्मी आणि सरस्वती या हत्तिणींना रविवारी दुपारी विशाखापट्टणमकडे रवाना करण्यात आले. शनिवारी या हत्तिणींना वाहनात चढविण्यात पालिकेच्या हुतांना अपयश आले होते. म्हणून रविवारी के्रनची मदत घेण्यात आली. शिवाय त्यांना गुंगीचे इंजेक्शनही देण्यात आले होते. त्यामुळे अवघ्या काही वेळातच या हत्तिणींना ट्रकमध्ये चढविणे शक्य झाले.  या हत्तिणी बाराशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून मंगळवारी दुपारनंतर विशाखापट्टणमला पोहचणार आहेत.

मनपाच्या प्राणिसंग्रहालयातील अपुर्‍या जागेमुळे सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने या  हत्तिणींना विशाखापट्टणम येथील इंदिरा गांधी झूलॉजिकल पार्कमध्ये हलविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विशाखापट्टणम येथील अधिकार्‍यांचे एक पथक शनिवारी सकाळीच शहरात दाखल झाले होते. पालिकेने शनिवारीच या हत्तिणींच्या रवानगीची तयारी केली होती; परंतु शनिवारी रात्री उशिरापर्यंत  प्रयत्न करूनही केवळ एकाच हत्तिणीला वाहनात चढविण्यात माहुतांना यश आले होते. त्यामुळे  हत्तिणींची रवानगी एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. तसेच वाहनात चढविलेल्या एका हत्तिणीलाही खाली उतरविण्यात आले होते. त्यानंतर रविवारी सकाळी या हत्तिणींना  हनात चढविण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. तसेच त्यांना गुंगीचे इंजेक्शनही देण्यात आले होते. दुपारी दीड वाजता विशाखापट्टणमचे पथक लक्ष्मी आणि सरस्वती या हत्तिणींना घेऊन प्रवासासाठी  वाना झाले. त्यांच्यासोबत पालिकेचे रामदास चव्हाण, भागीनाथ म्हस्के या माहुतांना पाठविण्यात आले आहे.

औरंगाबाद ते विखाखापट्टणम असा एकूण 1200 किलोमीटरचा प्रवास सरस्वती व लक्ष्मी या  मायलेकी करणार आहेत. ताशी 50 कि. मी. याप्रमाणे हा प्रवास राहील, असे पथकप्रमुख डॉ. नवीन कुमार यांनी सांगितले. नगर, सोलापूर मार्गे हैद्राबाद येथे त्यांचा मुक्‍काम असेल.  

माहुतांसह सर्वच कर्मचारी भावूक 

लक्ष्मी आणि सरस्वती या हत्तिणींना निरोप देताना प्राणिसंग्रहालयातील सर्वच कर्मचारी आणि अधिकारी भावूक झाले होते. मनपाचे प्राणिसंग्रहालय सुरू झाल्यानंतर  996 साली कर्नाटक येथील सफारी पार्कमधून शंकर आणि सरस्वती ही हत्तीणींची जोडी औरंगाबादेत आणली होती. या दोघांपासून 1997 साली लक्ष्मी या हत्तिणींचा जन्म झाला. त्यानंतर 1998 मध्ये शंकरचा मृत्यू झाला. तेव्हापासून सरस्वती आणि लक्ष्मी या दोघी माय-लेकी प्राणिसंग्रहालयात होत्या. आता या दोघीही गेल्याने प्राणिसंग्रहालयातील बच्चे कंपनीचे मोठे आकर्षण नाहिसे झाले आहे.