Thu, Sep 20, 2018 02:51होमपेज › Aurangabad › भीषण अपघातात एसआरपीएफ जवानासह चिमुरडीचा मृत्यू

भीषण अपघातात एसआरपीएफ जवानासह चिमुरडीचा मृत्यू

Published On: Dec 01 2017 5:36PM | Last Updated: Dec 01 2017 5:36PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या डिझेल टँकरने दुचाकीस्वारांना चिरडले. यात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. शहरातील केम्ब्रिज चौकात शुक्रवारी सकाळी ८ वाजता हा भीषण अपघात घडला.

किशोर दादासाहेब थोटे (२७, रा. फेरगाव) आणि गायत्री राजू दहिहंडे (१ वर्षे, रा. चिकलठाणा) अशी मृतांची नावे असून किशोर हा गायत्रीचा काका  होता. यात कावेरी राजू दहिहंडे ही गंभीर जखमी आहे. ते आडगाव खुर्द येथे रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला दुचाकीवरून जात होते.

 अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी गेले. त्यांनी जखमीला तत्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

डांबराच्या टिप्परने सेवानिवृत्त नायब तहसीलदार मधुकर कुलकर्णी यांना चिरडल्याची घटना गुरुवारी हर्सूल टी पॉइंटवर घडली होती. भरधाव वाहनांमुळे शहरात अपघातांची संख्या वाढली आहे. आणखी किती बळी घेतल्यानंतर यंत्रणा जागी होणार असा सवाल उपस्थित करण्यात आला होता. तोच दुसर्‍या दिवशी पुन्हा एका भरधाव टँकरने दोघांचा जीव घेतला.