Tue, Nov 13, 2018 06:10होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : न्यायाधीशांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्‍न

औरंगाबाद : न्यायाधीशांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्‍न

Published On: May 22 2018 10:25AM | Last Updated: May 22 2018 10:25AMकळंब : प्रतिनिधी

कळंब येथील न्यायालयाच्या आवारात न्यायाधीश यांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरुध्द कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी तात्काळ गजाआड केले आहे.

कळंब येथील दिवाणी न्यायाधीश आनंद मुंडे हे उन्हाळ्याची सुट्टी संपवून दि. २० मे रोजी रात्री आठ वाजता (एम एच ४४ बी १४०१) या चार चाकीमध्ये कळंब (जि. उस्मानाबाद) न्यायालयच्या परिसरात आले होते. मुंडे हे त्यांच्या निवास्थानाकडे जात असताना पहारेकरी घुगे यांना बोलत थांबले होते. यावेळी अचानक एक इंडिका कार न्यायालयाच्या परिसरात आली असता घुगे यांनी तुम्हाला काय पाहिजे असे विचारना केली असता गाडीतील काही लोक तुम्ही वकील असाला म्हणून काय झाले असा वाद घालत होते. याची विचारपूस करण्यासाठी न्यायाधीश मुंडे हे गाडीतून खाली उतरले त्यावेळी वाद घालणार्‍या व्‍यक्‍तिने न्‍यायाधीशांवर कार घालण्याचा प्रयत्‍न केला. याघटनंतर कार पहारेकर्‍यांनी अडविण्याचा प्रयत्‍न केला, मात्र गाडी घेऊन संशयित पसार झाला. यानंतर (एम एच ०३ एडब्लू २८२१) या गाडीविरोधात न्यायाधीश आनंद मुंडे यांच्या फिर्यादीवरुन आकाश चोंदे यांच्यावर कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी आरोपीला पोलीसांनी तात्काळ गजाआड  केले आहे. या गाडीमध्ये आकाश चोंदे याच्यासोबत आणखीन कोण व्यक्ती होते याची चौकशी पोलीस प्रशासन करत आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जलील शेख करत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नितीन कटेकर व पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली आहे. आकाश चोंदे याला वाशी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश यांनी २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.