Tue, Mar 26, 2019 23:54होमपेज › Aurangabad › नगर नाक्यावर लवकरच वाहतूक शाखेची चौकी

नगर नाक्यावर लवकरच वाहतूक शाखेची चौकी

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 1:12AMऔरंगाबाद : हर्षवर्धन हिवराळे

छावणीत पोलिस चौकी उभारण्यास जागा मिळावी म्हणून गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या वाहतूक विभागाच्या प्रयत्नाना अखेर यश लाभले आहे. परिषदेनी नगर नाक्याजवळ जागा देण्याचा निर्णय घेतला असल्याने येत्या आठवड्याभरात या ठिकाणी पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे.शहरात वाहतूक शाखेचे कर्मचारी हे ठिकठिकाणी चौकात ऊन, पाउस व थंडीत आपले कर्तव्य बजावत असतात. ही बाब लक्षात घेऊन बर्‍याच स्वयंसेवी संस्था व संघटनांनी त्यांना मनपाची परवानगी घेऊन महाविर चौक, आकाशवाणी, दुधडेअरी, बसस्थानक, रेल्वेस्टेशन  व इतर काही महत्त्वाच्या ठिकाणी चौकी उभारून दिली आहे. त्याशिवाय वाहतूक विभागातर्फ  दुधडेअरी, महावीर चौक या ठिकाणी स्पीकरची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

यामुळे वाहतूक कर्मचारी आता चौकीत बसून गाडी नंबरसह वाहनधारकास सूचना देऊन वाहतूक हाताळत आहेत. छावणी परिसरात देखील जुन्या पोलिस ठाण्यात या विभागाचे वाहतूक कार्यालय आहे. त्यामुळे नगर नाक्याजवळ वाहतूक विभागाला चौकी मिळावी अशी मागणी छावणी परिषदेकडे करण्यात येत होती. मात्र हा भाग लष्कराच्या हद्दीत येत असल्याने काही अडचणी येत होत्या. त्याशिवाय महानगरपालिकेकडून परिषदेनी टोलनाक्याचा ताबा काढून घेतल्यानंतर हे कार्यालय बंद पडलेले होते. हा रस्ता नगर व नाशिककडे जाणारा महामार्ग असून येथे चौकदेखील आहे. त्यामुळे नेहमी वाहतूक जाम होत असल्याने वाहतूक विभागाने सिग्नल लावून कर्मचारी नेमलेले आहेत. येथील जागा चौकी उभारण्यासाठी मिळावी यासाठी छावणी वाहतूक विभाग प्रयत्न करीत होता.

Tags : Aurangabad, Traffic, branch, post, soon, city naka