होमपेज › Aurangabad › मनपा विरोधात आज ‘गार्बेज वॉक’

मनपा विरोधात आज ‘गार्बेज वॉक’

Published On: Apr 17 2018 1:54AM | Last Updated: Apr 17 2018 12:51AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहराच्या कचराकोंडीला आज 61 दिवस पूर्ण होत आहेत. मात्र, ही समस्या अद्यापही जैसे थेच आहे. कचराकोंडी फोडण्यात मनपा सपेशल अपयशी ठरत आहे. मनपाच्या या निष्क्रिय कारभाराचा शहरवासीयांकडून अनोख्या पद्धतीने निषेध करण्यासाठी मंगळवारी  (दि.17) ‘गार्बेज वॉक’चे काढण्यात येत आहे. नारेगाववासीयांच्या विरोधानंतर शहरात दोन महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झालेली आहे. मात्र, मनपाकडून यावर ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता नागरिकांनीच मनपाच्या आणि राजकारणांंच्या बेजाबदार भूमिकेविरोधात रस्त्यावर येण्याचा निर्णय घेतला आहे. मनपाच्या भोंगळ कारभाराचा निषेध म्हणून औरंगाबाद कनेक्ट टीमच्या वतीने आज सकाळी 9 वाजता पैठणगेट येथील गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून ते महापालिकेपर्यंत ‘गार्बेज वॉक’ काढण्यात येत आहे.

मनपा बरखास्तीच्या प्रमुख मागणीसह कचरा छायाचित्रांचे चालते प्रदर्शन यावेळी केले जाणार आहे. हा गार्बेज वॉक पूर्णत: राजकीय पक्ष, संघटना विरहित अशी नागरी ऐक्याची हाक असून नागरिक म्हणून प्रत्येक औरंगाबादकराने यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Tags : Aurangabad, Today, Garbage, Walk, against, Municipal Corporation