Fri, Nov 16, 2018 09:37होमपेज › Aurangabad › पत्तरी ठोकण्याच्या व्यवसायातून ६०० रुपयाचा रोजगार

पत्तरी ठोकण्याच्या व्यवसायातून ६०० रुपयाचा रोजगार

Published On: Dec 24 2017 1:42AM | Last Updated: Dec 24 2017 12:54AM

बुकमार्क करा

पैठण : मनोज परदेशी

बैलाच्या पायांना नाळ ठोकून दिवसाकाठी 600 रुपयांची कमाई केली जात आहे. पैठणमधील संत एकनाथ सहकारी साखर कारखाना पैठणचा गळीत हंगामानिमित्त येणारे बैलगाड्यांचे मालक आपल्या बैलजोडीच्या खुरांना पत्तरी (नाळबंद) ठोकून घेत आहेत.बेरोजगारांना तेथे रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.

बैलगाडीतून सात ते आठ किलोमीटर अंतरावर ऊसाची वाहतूक केली जाते. एका बैलगाडीत अडीच ते तीन टन ऊस नेला जातो.याचा बैलांच्या खुरांवर मोठा ताण पडतो त्या घासून जखमा होतात, परिणामी बैल लगंडायला लागतात, तसेच डांबरी रस्त्यावर पाय घसरून बैलाचा मृत्यूही होतो. यावर खुरांना पत्तरी (नाळ) ठोकून घेणे हा उपाय योग्य ठरतो. यामुळे बैलांचे पाय घासले जात नाहीत व  व खुर्‍याचे रक्षण होते.

पत्तरी गळून पडल्यावर पुन्हा नाळ ठोकली जाते. यासाठी  गेवराई, शिरूर कासार, बीड, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर, राहुरी येथून सहाशे रुपये शेकडा या दराने लोखंडी नाळबंद विकत आणली जाते. एका बैल जोडीचा पायासाठी 300 रुपये मजुरी मिळते. तीन पिढ्यांपासून हा व्यवसाय  सुरू आहे 

कारखान्याचा गळीत हंगामामुळे ऊस वाहतुकीसाठी आलेल्या बैलांचा पायांना पत्तरी (नाळबंद) व्यवसायमुळे दररोज 600 रुपयांपर्यंत कमाई होते, बेरोजगार युवकांना रोजगारही मिळत आहे.