Fri, Jul 19, 2019 22:06होमपेज › Aurangabad › औरंगाबाद : धारदार शस्त्रांसह तीन दरोडेखोर जेरबंद

औरंगाबाद : धारदार शस्त्रांसह तीन दरोडेखोर जेरबंद

Published On: May 22 2018 8:08PM | Last Updated: May 22 2018 8:08PMविहामांडवा : प्रतिनिधी

लुटमार करण्यासाठी दबाधरुन बसलेल्या सहा संशयीत दरोडेखोरांपैकी तीन दरोडेखोरांना पोलिसांनी मोठ्या शीताफीने अटक केली. तसेच त्यांच्याकडून धारदार शस्‍त्रांसह कार व दुचाकी असा मुद्देमाल जप्‍त केला. पैठण तालुक्यातील विहामांडवा चिंचाळा रस्‍त्यावर सोमवारी (दि. २१) मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी पैठण तालुक्यातील पाचोड पोलिस ठाण्यात गुन्‍हा नोंदविण्यात आला आहे. 

विहामांडवा चिंचोळी रस्‍त्यापासून काही अंतरावर दरोडेखोरांची टोळी वाहनांना आडवून लुटमार करण्याच्या तयारीत होती. याबाबत खबर्‍यांकडून विहामांडवा पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार  एकशिंगे यांनी पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश आंधळे,उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड यांना घटनेची माहिती दिली. या घटनेचे गांभीर्य पाहूनत तसेच सहकाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेत सापळा रचला. खबऱ्याने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे असलेली कार व दुचाकी आढळून आली. 

लुटमारीसाठी ६ जण दबा धरून बसले होते. पोलिसांनी सापळा रचला. परंतु, पोलिसांना बघताच ३ जणांनी पळ काढला. पोलिसांनी कारमध्ये बसलेल्या तिघांना पळण्याच्या तयारीत असताना पकडले. तसेच त्यांच्याकडून कार, दुचाकीसह धारदार शस्‍त्रास्‍त्रे जप्‍त केली. डिमेश मुराब पवार (वय ३२), सचदेव मुराब पवार (वय २५) व मुराब अमृता पवार या जालना जिल्‍ह्यातील रामगव्‍हाण (ता. अंबड) च्या तिघांच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांना कारमध्ये धारदार हत्यारे, मिरची पूड, दोरी, बॅटरी, मोबाईल आढळले. तसेच दरोडेखोरांजवळील दुचाकीही जप्‍त केली. याप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

दरोडेखोरांचा इतर घटनेत सहभागाची शक्यता

विहामांडवासह, मिरखेडा परिसरात चोरी दरोडाचे घटना घडल्या असून या संशयीत तिघा दरोडेखोरांचा व त्यांच्या साथीदाराचे सहभाग या घटनांत असण्याची दाट शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी दिली.